washim  father killed the child, Read What would be the reason? 
विदर्भ

धक्कादायक : जन्मदात्या वडीलानेच केली मुलाची हत्या, वाचा काय असेल कारण?

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि.वाशीम) :  तालुक्यातील गोंडेगाव येथील विशाल रमेश ससाने या युवकाची सोमवारी (ता.4) मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मंगळवारी (ता.5) त्याचा मित्र रतन गोबरा राठोड याला अटक करण्यात आली होती. मात्र, या हत्येला कलाटणी मिळाल्याने प्रकरणातील फिर्यादी युवकाचा जन्मदाताच हत्यारा निघाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रमेश उकंडा ससाने याला रविवारी (ता.10) अटक केली आहे.  


यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील  गोंडेगाव येथील युवक विशाल रमेश ससाने (वय38) या युवकाची डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली होती. मुलाला दारूचे व्यसन नडल्यामुळे दारूचे पैसे देण्यावरून त्याची हत्या मित्र रतन गोबरा राठोड याने केली असावी, असे फिर्यादीत मुलाचे वडील यांनी म्हटले होते.

अशा तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी संशयीतास ताब्यात घेऊन दोन दिवसाची पोलिस कोठडी घेतली होती. मात्र, घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिशिर मानकर यांनी स्वःता आपल्याकडे घेतला होता. पोलिस तपासात फिर्यादी विशालचे वडील रमेश ससाने यांनी हत्या करून शेतात झोपायला निघून गेले होते. विशालला दारूचे व्यसन नडल्यामुळेच व शेतीच्या वादावरून हत्या केली असावी या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT